Best Amazing Jokes in Marathi

Best Amazing Jokes in Marathi

Best Jokes in Marathi


नवरा : आज जेवायला काय बनवतेस?
बायको : आमरस, पुरी, वरण, शेवग्याची आमटी, वांग्याचे भरीत,
आळुच्या वड्या, मेथीची भाजी, कांदा भजी, कोशिंबीर,
खोबऱ्याची चटणी आणि मसाला ताक.
नवरा : चटणी-भाकर वाढ पण असं राजकारणी लोकांसारख गंडवू नको.

कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात.
त्यांना भेटायचं असतं.
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनीमधून एक नाणं खाली टाकते.
आवाज ऐकल्यानंतर तू वर ये.
(मुलगी नाणं खाली फेकत पण मुलगा तासाभरानी तिच्या रूममध्ये पोहचतो.)
मुलगी : एवढा उशीर का केलास?
मुलगा : मी ते नाणं शोधत होतो.
पण सापडलच नाही.
मुलगी : अरे मूर्खा, सापडणार कसं?
मी दोरा बांधून खाली फेकलेलं. मी घेतलं ते ओढून.

त्यांची सोशल मीडियावर ओळख होते…
गर्लफ्रेण्ड : मी जेव्हा-जेव्हा तुला फोन करते,
तेव्हा-तेव्हा तू दाढीचं करत असतोस.
तू दिवसातून किती वेळा दाढी करतोस?
बॉयफ्रेण्ड : ३० ते ४० वेळा.
गर्लफ्रेण्ड : काहीतरीच…
बॉयफ्रेण्ड : काहीतरीच… नाही. माझं ‘हेअर कटींग सलॉन’ आहे.

मन्या जन्याला सांगत होता…
हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर
डोकं ठेवून हळूच विचारतात
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात
दुसरी कोणी होती का रे?
इथं तुमचं उत्तर महत्त्वाचं नसतं,
तर महत्वाचे असतात…
तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका.

मन्याला रस्त्यात लावलेले फलक वाचायचा भारी नाद असतो.
एकदा रात्री घरी येताना एक फलक त्याला दिसतो.
रात्र असल्याने अंधुक दिसत असतं…
म्हणून मन्या ‘स्पायडर मॅन’सारखा खांबावर चढतो.
त्याने वाचलं, तर बोर्डावर लिहिलेलं असतं…
‘खांबाला लावलेला रंग ओला आहे, हात लावू नका.’

नवरा : जर मला लॉटरी लागली,
तर तू काय करशील?
बायको : अर्धे पैसे घेऊन कायमची…
माहेरी निघून जाईन.
तुम्हीपण खूश आणि मीपण खूश.
नवरा : २० रुपयांची लागली आहे.
हे घे १० रूपये आणि माहेरी जा.

तुमची किडणी फेल झाली आहे.
मन्या आधी खूप रडतो…
नंतर डोळे पुसत विचारतो,
“किती मार्कांनी?”
Previous Post Next Post